Thursday 4 January 2018

SIP.......Systemic Investment Plan

_*SIP*_


गेल्या ५-१० वर्षामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे SIP हा गुंतवणूक पर्याय घराघरात पोहचला आहे. त्याबद्दल म्युच्युअल फंड कंपन्या, गुंतवणुवकी विषयक मासिके, वर्तमानपत्रे यांचे आभार मानावे तितके कमी कारण, भारतीय लोकांना त्यांच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढून शेअर बाजारातील म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीकडे वळवणे तेवढे सोपे नाही पण आज कुठे तरी मोठा बदल होताना दिसतोय.

आज SIP करायची आहे म्हणून खूप ग्राहक बाजारात येतात, गुंतवणूक करतात पण अजून त्यांना
• SIP म्हणजे नक्की काय ?
• म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय ?
• म्युच्युअल फंड किंवा SIP कशी काम करते ?
• SIP हे गुंतवणुकीचे प्रॉडक्ट नाही तर गुंतवणुकीची पद्धत आहे.

अशा गोष्टींबद्दल काहीच माहिती नसते, तेव्हा लक्षात येते की इथे सुद्धा गुंतवणूकदारांची मानसिकता ही इतर गुंतवणूकीसारखीच आहे. मी जेव्हा विचारतो तुम्हाला SIP का करायची आहे तर कारणे मिळतात.... माझे सहकारी करतात, माझा भाऊ करतो, माझे सर्व मित्र करतात म्हणून मला पण सुरुवात करायची आहे. म्हणजेच काय एक संपत्ती निर्माण करण्याचा हमखास मार्ग आज तुमच्याकडे आहे पण तुम्हाला त्याची ताकद माहित नाही ही शोकांतिका आहे. हो की नाही ? आज अल्लादिनचा चिराग आपल्याला मिळाला तर आपण काय काय मागू ?? तसेच या म्युच्युअल फंड : SIP च्या माध्यमातून तुम्ही खूप काही मिळवू शकता फक्त तुम्हाला या गुंतवणूक पर्यायाची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. मागे आपण म्युच्युअल फंडाचे प्रकार पहिले आज आपण म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचा SIP ही पद्धत पाहूया.

* म्युच्युअल फंड : SIP म्हणजे नक्की काय ?*

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पद्धती आहेत जसे की
1. Lumpsum Investment
2. Systematic Invesment Plan
3. Systematic Withdrawal Plan
4. Systematic Transfer Plan
वरील ४ पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे ‘म्युच्युअल फंड : SIP’ आणि आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

* Systematic Invesment Plan म्हणजे नक्की काय?*

Systematic Invesment Plan म्हणजे ज्याप्रमाणे आपण बँकेत किंवा पोस्ट मध्ये दरमहिन्याला RD अकाउंटला पैसे भरतो आणि ती छोटीशी रक्कम पुढच्या ५-१० वर्षात एक मोठी रक्कम होते. त्याचप्रमाणे Systematic Invesment Plan (SIP) नुसार दरमहिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. फरक इतकाच की, ही ऑटोमेटेड सिस्टिम आहे आणि आतापर्यंत आपण दरमहिन्याला ज्या गुंतवणूक करत आलो त्या सर्व आपण स्वतः बँकेत किंवा पोस्टात जाऊन कराव्या लागत होत्या त्या गुंतवणुकीमध्ये काही त्रुटी राहत होत्या, त्या या म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये भरून काढल्या आहेत.

*म्युच्युअल फंड SIP करण्याची प्रक्रिया कशी असते ते पाहूया*

1. महिन्याला किती रक्कम आपण गुंतवू इच्छितो ते ठरवणे
2. म्युच्युअल फंड कंपनी आणि स्कीम निवडणे
3. महिन्याच्या कोणत्या तारखेला बँकेतून पैसे SIP साठी जाणार ती तारीख ठरवणे
4. किती कालावधीसाठी आपण गुंतवणूक करणार आहोत ते ठरवणे
5. म्युच्युअल फंड SIP फॉर्म भरणे

अशा प्रकारे म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीचा आपण श्रीगणेशा आपण करू शकतो. या म्युच्युअल फंड SIP ची काही वैशिष्ट्ये आपण बघूयात

*1. गुंतवणुकीला शिस्त आणते :*- दर महिन्याला डायरेक्ट बँक अकाउंट मधून SIP साठी रक्कम वजा होत असल्यामुळे गुंतवणुकीला एक शिस्त प्राप्त होते.

*2. चक्रवाढ व्याजाची शक्ती :* जितका जास्त वेळ तुम्ही द्याल तितके जास्त तुम्ही मिळवलं. एखाद्या ३० वर्षीय व्यक्तीने त्याच्या वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत पर्यंत दर महिन्याला १०००० रुपये गुंतवणूक केली तर पुढील ३० वर्षात १५% जरी परतावा मिळाला तर त्याचे ३६ लाख गुंतवणुकीचे ७ कोटी होतील. ही चक्रवाढ व्याजाची शक्ती आहे.

*3. सुलभता :-* SIP मध्ये तुम्ही महिन्याला ५००-१००० रुपये पासून गुंतवणूक सुरुवात करू शकता. ज्यामुळे तुमच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम होत नाही.

*4. रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग :-*हे एक गुंतवणुकीचे तंत्र आहे. मार्केट मध्ये तेजी-मंदीचा फायदा या तंत्रामध्ये होतो. मार्केट खाली असल्यास जास्त युनिट खरेदी करता येतात कारण त्यामुळे भाव तुटलेले असतात.

*5. प्रत्येक वेळ योग्य वेळ :-* शेअर बाजारात काही ‘अति स्मार्ट गुंतणूकदार’ शेअर बाजाराच्या चढ-उतारावचे निरीक्षण करून कार्य पैसे गुंतवत असतात. जे अजून स्वतः वॉरेन बफेट सरांनासुद्धा जमले नाही. SIP पर्यायामध्ये हा विषयच राहत नाही कारण मार्केट मध्ये तेजी असो किंवा मंदी, गुंतवणूक होत राहते.
👍👍👍👍👍

No comments:

Post a Comment